जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, भाजप छत्रपती शिवाजी महाराज मंडळ क्रमांक १ तर्फे शहरात वृक्षारोपण आणि वृक्ष वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
याप्रसंगी श्री मोटर्सचे संचालक सचिन चौधरी, महानगर उपाध्यक्ष तथा पर्यावरण जिल्हा संयोजक राजू मराठे, जिल्हा सहसंयोजक राहुल वाघ, माजी मंडळ अध्यक्ष संजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते निलेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, उमेश देशपांडे, हर्षल सपकाळ, संजय सोनवणे, तुषार सूर्यवंशी, जयवंत चव्हाण, विनय चौधरी, विनोद साळुंखे, अशोक घाडगे, राहुल संकत, शुभम विंचवेकर, पिंटूभाऊ सपकाळे आणि सर्व कबड्डी खेळाडू व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे पर्यावरणाविषयी जनजागृती वाढण्यास मदत झाली आणि नागरिकांनाही वृक्षारोपण