जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात 11 जून रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि परिसराला हरितावरण देण्यासाठी महाविद्यालयाच्या आवारात वड, पिंपळ यासारख्या भारतीय परंपरेतील औषधी गुणधर्म असलेल्या झाडांची लागवड करण्यात आली.
सेंद्रिय खताचा वापर करून वैज्ञानिक पद्धतीने लागवड
झाडांची लागवड तीन ते चार फूट खोल खड्ड्यात काळी माती आणि कंपोस्ट खत यांचा वापर करून करण्यात आली. झाडांची उंची 14 ते 15 फूट इतकी असून, यामुळे लवकरच या झाडांना आकार येऊन ते सावली देणारे वृक्ष होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
संचालकांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ
या वृक्षारोपण उपक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके आणि डॉ. केतकी पाटील ,कॉलेज ऑफ नर्सिंग चे प्रा. शिवा बिरादर यांच्या हातून करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात विविध उपक्रम राबवले जात असून, पर्यावरणपूरक उपक्रमाला त्यांनी विशेष प्राधान्य दिले आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकांचा पुढाकार
वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन आणि देखरेख महाविद्यालयाचे प्रा. चंद्रकांत डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन हे शिक्षकांच्या पुढाकारामुळे शक्य झाले असून, गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयात पर्यावरण जागरूकतेसाठी वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. संचालक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला.