जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात ट्राला आणि टँकर यांच्यात अपघात झाल्याची घटना रविवारी १५ जून रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार घेण्याचे काम सुरू असून दोन्ही चालकांना चौकशीसाठी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात रविवारी १५ जून रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास टँकर क्रमांक (जीजे १६ एडब्ल्यू ९६१५) आणि ट्राला क्रमांक (सीजी ०७ सीए ४६८२) याचा अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही मात्र ट्रालाच्या वाहनाकडील भागाचे नुकसान झाले आहे. अपघात घडल्यानंतर अर्धातास वाहतूकीची कोंडी झाली होती. त्यानंतर जिल्हापेठ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही वाहनांना रस्त्याच्या बाजूला केले आणि वाहतूक सुरळीत केली. दरम्यान दोन्ही वाहनांवरील चालकांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले आहे. याबाबत पोलीसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.