मुंबई लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार धक्का बसला असून भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांच्यासह मातब्बरांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विविध पक्षांमधील मान्यवर हे शिवसेना शिंदे गटात दाखल होत आहेत. यात आज अजून नव्याने भडगाव तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची भर पडली आहे. आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यात भडगाव तालुक्यातील उबाठा गटाचे प्रवक्ते आणि माजी नगराध्यक्ष गणेश आण्णा परदेशी, किसान परिवाराचे प्रताप हरी पाटील आणि कोठलीचे उबाठा गटाचे उप-जिल्हाप्रमुख दीपक आधार पाटील यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आज शिवसेना शिंदे गटात दाखल झालेले मान्यवर हे भडगावच्या राजकारणातील मातब्बर म्हणून ओळखले जातात. ते पक्षात आल्यामुळे शिवसेना शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मात्र मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.