जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग.स. सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य अध्यक्ष संजय खामकर (अहिल्यानगर) यांनी ही नियुक्ती केली आहे.
या निवडीप्रसंगी राज्य सदस्य विश्वनाथ सावकारे, संजय वानखेडे, संजय भटकर, काशिनाथ इंगळे, वसंत नेटके, जिल्हाध्यक्ष अर्जुन भारुळे, सचिव धनराज भारुळे, राजेश वाडेकर, कैलास वाघ, खंडू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
विजय पवार हे सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय राहिले आहेत. त्यांनी यापूर्वी विद्यार्थी गुणवंत सत्कार, वधू-वर परिचय मेळावा, समाज भवन निर्माण, सामाजिक जनजागृती यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये महत्त्वाचा सहभाग घेतला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल समाजबांधवांकडून आणि विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.