जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील घाणेकर चौकात एका वृध्दाला बोलण्यात गुंतवून अनोळखी दोन भामट्यांनी त्यांच्या हातातील ५ ग्रॅम वजनाची ४० हजारांची सोन्याची अंगठी चोरून नेल्याची घटना रविवारी १ जून रोजी दुपारी १२ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अनोळखी दोन जणांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुरेश पंढरीनाथ भोळे वय ७२ रा. खेडी शिवार, जळगाव हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. रविवारी १ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने जळगाव शहरातील घाणेकर चौकात आलेले होते. त्यावेळी त्यांनी अनोळखी दोन जण भेटले. त्यांनी सुरेश भोळे यांना केळीच्या गाडीवर बोलण्यात अडकवून त्यांच्या हातातील ४० हजार रूपये किंमतीची ५ ग्रॅम सोन्याची अंगठी काढून काही कळण्याच्या आत पसार झाले. ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने जवळच्या शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अनोळखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय खैरे हे करीत आहे.