जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धुळे येथील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवत बुलढाणा जिल्ह्यातील एकाने जळगाव रेल्वे स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये नेवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवारी १ जून रोजी रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धुळे शहरातील एका भागात ३५ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान विनोद शिवराम कुसळकर रा. वडपुराराम नगर, ता. मेहकर जि. बुलढाणा याच्याशी महिलेची ओळख निर्माण झाली. या ओळखीचा फायदा घेत विनोदने महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. अखेर महिलेने जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी विनोद कुसळकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितलकुमार नाईक हे करीत आहे.