जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील बसस्थानक सर्कलजवळ किरकोळ कारणावरून अश्लिल शिवीगाळ करत एका तरूणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी ६ जून रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी शनिवारी ७ जून रोजी सकाळी ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नंदगाव येथे शरद ईश्वर धनगर वय २५ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गावातील बसस्थानक येथील सर्कल जवळ शुक्रवारी ६ जून रोजी सकाळी ११ वाजता शरद हा मित्रांसोबत बसलेला असतांना गावात राहणारा रूपेश उर्फ वेदांत पांडूरंग धनगर याने तू माझ्याकडे रागाने बघतो असे सांगून अश्लिल शिवीगाळ करत हातातील लाकडी दांडका शरदच्या पाठीवर, खांद्यावर आणि हातावर मारहाण गंभीर जखमी करून धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर शरद धनगर याने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी ७ जून रोजी सकाळी ११ वाजता संशयित आरोपी रूपेश उर्फ वेदांत पांडूरंग धनगर यांच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहे.