चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील गोरगावले ते मालापूर रस्त्यावरील हिरा कॉटन कंपनीजवळून गुरांची निर्दयीपणे घेवून जात असतांना एकावर चोपडा शहर पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार गुरांची सुटका करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील गोरगावले ते मालापूर रस्त्यावरून गुरांची निर्दयीपणे घेवून जात असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने शनिवारी ३१ मे रोजी दुपारी १ वाजता कारवाई संशयित आरोपी राकेश नरमसिंग जाधव याच्यावर कारवाई केली. त्याने गुरांच्या डोळ्यात मिरची टाकून घेवून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पथकाने त्यांच्यावर कारवाई केली आणि चारही गुरांची सुटका करण्यात आली. यासंदर्भात पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राकेश जाधव याच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र सोनवणे हे करीत आहे