धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली आडोश्याला गांजाचे सेवन करणाऱ्या एका तरूणावर धरणगाव पोलीसांनी शनिवारी ३१ मे रोजी रात्री ८.३० वाजता कारवाई केली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव शहरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या मोकळ्या जागी काही जणा गांजाचा नशा करत असल्याची माहिती धरणगाव पोलीसांना मिळाली. त्यानुसार धरणगाव पोलीसांनी शनिवारी ३१ मे रोजी रात्री ८.३० वाजता पंकज भगवान पवार (वय-२८ रा. पारोळा नाका, धरणगाव) याच्यावर पोलीसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून गांजा ओढण्याचे साहित्य जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शशीकांत पाटील हे करीत आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील हे करीत आहे.