चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा येथे गोवंशाच्या मांसाची तस्करी करणाऱ्या एका चारचाकी वाहनावर अडावद पोलिसांनी कारवाई करत सुमारे ७७७ किलो गोमांस जप्त केले. ही कारवाई एका गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली असून, यामध्ये सुमारे चार लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास प्राणी फाऊंडेशनच्या नेहा दीदी पटेल यांना दादामाऊली यांनी अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर महामार्गावर एका चारचाकी वाहनातून गोमांस नेले जात असल्याची माहिती दिली. या माहितीनंतर गोरक्षकांनी सदर वाहनाचा पाठलाग सुरू केला. माचला ते वर्डी फाट्याच्या दरम्यान, एका फार्महाऊससमोरील महामार्गाखाली असलेल्या केळीच्या शेतात, गोमांस असलेले वाहन एमएच ४३ बी बी ०४०९ सुमारे दहा फूट खोल खड्ड्यात उतरले. मात्र, चालक तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला.
गोरक्षकांनी तात्काळ अडावद पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच, अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, हवालदार विनोद धनगर, संजय धनगर, आणि अन्वर तडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.