यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील काँग्रेस पक्ष संघटनेला नवसंजीवनी देणारी घडामोड घडली असून, पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते शेखर सोपान पाटील यांची यावल तालुका ग्रामीण ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर शेख हकीम मोहम्मद याकूब यांना यावल शहर काँग्रेस कमेटी अध्यक्षपदी नेमण्यात आले आहे. या निवडीमुळे तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
सौखेडा सिम येथील रहिवासी असलेले आणि यावल पंचायत समितीमध्ये एकनिष्ठ कामगिरी बजावलेले शेखर सोपान पाटील हे काँग्रेस पक्षाच्या कार्यात दीर्घकाळ सक्रीय आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांचा विचार करून काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार त्यांची तालुका ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पाटील हे पक्षासाठी खंबीर आधारस्तंभ मानले जातात.
दुसरीकडे, शहर पातळीवर काँग्रेस संघटन मजबूत करण्यासाठी शेख हकीम मोहम्मद याकूब यांना यावल शहराध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली आहे. समाजात सक्रिय असलेले शेख हकीम हे विविध सामाजिक उपक्रमात भाग घेणारे तरुण नेतृत्व आहे. त्यांच्या निवडीने युवा वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.
या दोन्ही निवडींचे स्वागत रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिरास मधुकरराव चौधरी, एनएसयूआयचे धनंजय चौधरी, पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी हाजी शब्बीर खान, पंचायत समितीचे माजी उपसभापती लिलाधर चौधरी, सैय्यद जावेद अली, मारूळचे सरपंच सैय्यद असद अली, सरपंच परिषदचे संदीप सोनवणे, दहिगावचे सरपंच अजय अडकमोल, डोंगर कठोरा सरपंच नवाज तडवी यांनी केले.
तसेच काँग्रेस कमिटीचे यावल शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, प्रदेश प्रतिनिधी उमेश जावळे, अभय महाजन, हाजी गफ्फार शाह, अशपाक शाह, धीरज कुरकुरे, अल्ताफ तडवी, मोईन पटेल आदी कार्यकर्त्यांनी दोन्ही नव्या अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी नव्या नेतृत्वाला भरभरून शुभेच्छा देत आगामी काळात काँग्रेस संघटना अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.