भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील द्वारका नगरात फोन करून धमकी दिल्याच्या जाब विचारल्याच्या कारणावरून तरूणाला चार जणांकडून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवारी ६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी ९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात मारहाण करणारे चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील द्वारका नगरात शफीक खान रजीम खान वय २८ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. दरम्यान त्यांचे काका अजिम खान यांना डॉ. फिरोज खान यांना फोन वरून शिवीगाळ केली होती. याचा जाब शफीक खान याने विचारला या कारणावरून शुक्रवारी ६ जून रोजी सायंकाळी ७ वाजता डॉ. फिरोज खान. अफरोज खान, ऐहेतशाम आणि आवेश सर्व रा. रजा टॉवर भुसावळ यांनी शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून धमकी दिली. ही घटना घडल्यानंतर शफीक खान याने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी ९ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ दिपक पाटील हे करीत आहे.