धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील सोनवद रस्त्यावर शेतातून घरी पायी येत असताना १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात वाहनाने जोरदार दिल्याने जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी १२ जून रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. हिरालाल नामदेव पाटील (वय-३८, रा. बाभळे ता. धरणगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील बाभळे गावात हिरालाल पाटील हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला होता. १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता हिरालाल हे शेतातून काम करून घरी पायी येत असतांना धरणगाव सोनवत रोडवरील महादेव मंदिराजवळ अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात गुरूवारी १२ जून रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीम सय्यद करीत आहे.