पारोळा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा पोलीस स्टेशनला पहूर येथून आलेले पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी चार्ज घेतला असून पारोळा येथील पोलीस निरीक्षक सुनील पवार यांची धरणगाव पोलीस स्टेशनला बदली नवीन आलेले पोलीस निरीक्षक यांच्याकडे पारोळा वाश्यांच्या मोठ्या अपेक्षा पल्लवी झाल्या असून शहरातील कायदा सुव्यवस्था याच्यात सुधारणा होईल अशा आशा आहेत त्यामुळे नवीन या यांच्याकडे मोठी जबाबदारी असल्याचे बोलले जात आहे.
शहरात सध्या स्थितीत पारोळा शहरात अवैध धंदे बोकाळले असून त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी नवीन पोलीस निरीक्षकांना कसरत करावी लागणार आहे. शहरात अवैध धंदे यात मुख्य मटका, जुगार, पत्ते, दारू विक्री असे विविध बेकायदेशीर धंदे जोमात सुरू असून त्यांना आता तरी आळा बसेल का व त्यामुळे होणारे गुन्हेगारी बंद होईल का ? याकडे सर्वांचे लक्ष असून नवीन पोलीस निरीक्षक ते बंद करतील अशा आशा पारोळेकरांना आहेत.
म्हणून नवीन अधिकाऱ्यांच्या वर मोठी जबाबदारी असून त्यांनी शहरातील अवैध धंद्यांना आळा बसेल अशी कडक कारवाई करावी व सामान्यांना दिलासा द्यावा अशा नागरिकांमध्ये चर्चा आहेत. नवीन पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्याकडून जनतेच्या वाढीव अपेक्षा असल्याचे दिसून येत आहे.