पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कै. कृषी पंडित मोहनलाल लोढा यांच्या तेराव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आणि महासती शौर्याजी महासा यांच्या दीक्षा दिनानिमित्त पहूर येथे एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या सौजन्याने आयोजित या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, तब्बल ८५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दादा गरुड होते. भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जितु भाऊ पाटील, मयूर भाऊ, मोरसिंग द. राठोड, विलास राजपूत, आणि जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांसारखे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कै. कृषी पंडित मोहनलाल लोढा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी चंद्रकांत बाविस्कर, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा, माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील, आणि माजी जिल्हा परिषद सदस्य संजय दादा गरुड यांनी मनोगत व्यक्त केले.
हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्था (शाखा पहूर व पाळधी), महात्मा फुले पतसंस्था, स्वरछाया कृषी केंद्र, कमल सिंधू कृषी केंद्र, रायचंद सोभागचंद लोढा पतसंस्था, ग्रामपंचायत पहूर पेठ, डॉक्टर असो व मेडिकल असो पहूर, विकास सोसायटी पहूर व पाळधी, पहूर शहर पत्रकार संघटना, महावीर पब्लिक स्कूल, कृषी पंडित पेट्रोल सप्लायर्स, आणि भारतीय जैन संघटना या विविध संस्थांनी विशेष सहकार्य केले.
इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे डॉ. अरविंद चौधरी, सुनील वाघ, रूपाली बडगुजर, किरण बाविस्कर, रवींद्र जाधव, अन्वर खान हे यावेळी उपस्थित होते.
या शिबिराला जिल्हा परिषद सदस्य प्रमिलाताई पाटील, माजी उपसरपंच श्याम सावळे, उपसरपंच राजु जाधव, पंकज लोढा, संजय पाटील, साहेबराव देशमुख, संजय देशमुख, राजु पाटील सर, पहूर शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र लाठे, पत्रकार मनोज जोशी, पत्रकार शरद बेलपत्रे, विकास लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्थेचे पहूर व पाळधी येथील सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांनी अथक परिश्रम घेतले.