धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव नगरपालिका क्षेत्रात दिनांक ९ जून ते १४ जून २०२५ दरम्यान आयोजित मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिर सप्ताहास नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. या आरोग्य शिबिरात सुमारे ३० ठिकाणी मोफत तपासणी शिबिरे घेण्यात आली, ज्यातून ३५०० पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला. हे शिबिरे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले.
या आरोग्य शिबिरात नेत्ररोग, अस्थिरोग, बालरोग, स्त्रीरोग आणि जनरल मेडिसिन या विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा दिली. रुग्णांची रक्त तपासणी, ईसीजी, आणि इतर प्राथमिक तपासण्या मोफत करण्यात आल्या. तपासणीनंतर ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया किंवा विशेष उपचारांची आवश्यकता होती, त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसह इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून संदर्भित करण्यात आले.
शिबिरादरम्यान २८ मोतीबिंदू रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया काताई हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रिया माननीय गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने पार पडल्या. याशिवाय ३०० हून अधिक रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. ६०० पेक्षा जास्त रुग्णांची रक्त तपासणी तर ३०० हून अधिक रुग्णांची ईसीजी तपासणी करण्यात आली.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ पाटील आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. झवर साहेब उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कैलास माळी, पप्पू भावे, विलास महाजन, ललित येवले, भीमराज पाटील यांच्यासह डॉक्टर विलास महाजन, डॉ. सूर्यवंशी, डॉ. पंकज व मनोज अमृतकर, डॉ. चेतन पाटील, डॉ. चेतन भावसार, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. सुचित जैन, डॉ. विनय कुमट, डॉ. निधी अमृतकर, डॉ. मराठे मॅडम, डॉ. जैन मॅडम, विनयजी कापुरे, नितेश माळी, संदीप गायकवाड, विशाल अमृतकर यांचे विशेष योगदान लाभले.