अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत युगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी यांनी १९८६ मध्ये सुरू केलेले रक्तदान अभियान आज एका महाअभियानाच्या रूपात सर्वोच्च बिंदूवर पोहोचले आहे. गेल्या चार दशकांत संत निरंकारी मिशनने ८६४४ शिबिरे आयोजित करून मानवकल्याणासाठी तब्बल १४,०५,१७७ युनिट रक्त संकलित केले आहे. दरवर्षी २४ एप्रिलपासून हे महा रक्तदान शिबिर सुरू होते आणि सध्या देशभरात ५०० हून अधिक शाखांमध्ये ५०,००० हून अधिक रक्तदाते निस्वार्थपणे रक्तदान करून मानवतेची सेवा करत आहेत.
अमळनेरमध्ये जनजागृती आणि शिबिराचे आयोजन
१४ जून, शनिवार रोजी अमळनेर शहरात रक्तदान शिबिराच्या जनजागृतीसाठी एका भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याच मोहिमेचा भाग म्हणून, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली, शाखा अमळनेर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी धुळे झोन ३६-बी अंतर्गत परम श्रद्धेय श्री. हिरालाल पाटील, झोनल इंचार्ज धुळे झोन ३६-बी यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी सत्संग भवन, चोपडा रोड, सिंधी कॉलनी, अमळनेर येथे १५ जून, रविवार रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सामाजिक कार्याची प्रशंसा
रक्तदान शिबिराचे उद्घाटन माननीय हिरालाल पाटील, झोनल इंचार्ज (धुळे झोन ३६-बी) यांच्या हस्ते झाले. यावेळी अमळनेर परिसरातील ग्रामीण भागातील तसेच स्थानिक साधसंगत मोठ्या संख्येने उपस्थित होती. उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी संत निरंकारी मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले की, मिशन केवळ आध्यात्मिक कार्यच नाही, तर रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, “स्वच्छ जल स्वच्छ मन”, वृक्षारोपण, नेत्र तपासणी यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांमध्येही महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
रक्त संकलन आणि आभार प्रदर्शन
अमळनेर ब्रांचचे सेवादल इंचार्ज श्री. जितेंद्र डिंगराई यांनी उपस्थित अतिथींचे स्वागत आणि सत्कार करत संत निरंकारी मंडळाच्या वतीने आभार मानले. या शिबिरात एकूण ६० युनिट रक्त संकलन करण्यात आले. रक्त संकलनासाठी जळगाव येथील रेडक्रॉस रक्तपेढीचे डॉक्टर्स आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदात्यांसाठी सुविधा व यशस्वी आयोजनामागील परिश्रम
या विशाल रक्तदान शिबिरात रक्तदात्यांसाठी चहा-पाणी, फळफळावळ, अल्पोपहार, जेवणाची योग्य व्यवस्था तसेच प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमळनेर ब्रांचचे मुखी श्रीचंद दादा निरंकारी यांच्यासह सर्व साधसंगत, सेवादल सदस्य (पुरुष आणि महिला) यांनी अथक परिश्रम घेतले.